21 ऑगस्ट 2024 माझ्या आयुष्यातला काळा दिवस सकाळी पहाटे तीन वाजता मी झोपेत होतो अच

Generation Data
Records
Prompts
Copy
21 ऑगस्ट 2024 माझ्या आयुष्यातला काळा दिवस सकाळी पहाटे तीन वाजता मी झोपेत होतो अचानक उलटी काढण्याचा आवाज मला ऐकू आला मी धावत हॉलमध्ये गेलो तर वडील अण्णा बाथरूम मध्ये उलटी करत होते…
..
मी घाबरलो मला असं वाटलं काय झालं आहे मी उठून हॉल मद्दे गेलो
,
ते बाहेर आले मला म्हटले माझं पोट बिघडले आहे मला ऍसिडिटी झाली आहे
,
रात्रीचे जेवणाने कदाचित माझं पोट बिघडल असेल मी त्याना ऍसिडिटी ची गोळी द्यावी पण घरात गोळी नसल्यामुळे भावाने मेडिकल मध्ये जाऊन ऍसिडिटी ची गोळी आणली आणि त्यांना दिली त्यांना काय होतंय हे त्यांना सांगता येत नव्हतं तरी आम्ही त्यांना विचारलं की तुमचा हृदयात चमका मारत आहे का
,
छाती दुखत आहे का
,
तर ते बोलले नाही माझं पोट दुखतंय माझं पोट जड झाले आहे…
.
विठ्ठलाचे सच्चे भक्त आणि विठ्ठल आणि विठ्ठलाचे मंदिर हे त्यांचे घर केलं होतं…
.
फक्त झोपायला आणि जेवायला ते घरी येत असे
,
दिवसभर ते मंदिराची सेवा करत असे मागील काही वर्षांमध्ये त्यांच्यामध्ये खूप बदल झाला होता पूर्णपणे त्यांनी स्वतःला विठ्ठलमय करून सोडल होत…
.
आई आमची बोलली होती की दवाखान्यात घेऊन जाऊया आता पण आम्ही विचार केला की फक्त ऍसिडिटी आहे ते हृदय चा त्रास जाणवत नाही कारण पाई वारी करून आलेले आमचे वडील आणि दोन महिन्यापूर्वी सर्व टेस्ट चे रिपोर्ट नॉर्मल आले होते…
आम्ही चूक केली
,
उशीर केला का देवाने आम्हाला भुरळ पाडली माहित नाही… आम्ही नंतर झोपलो
त्यानंतर त्यांनी सहा वाजता उठून आंघोळ केली मंदिरात जाण्यासाठी गडबड चालू केली पण त्यांना चक्कर येत होती तर आई म्त्यांना म्हणाली तुम्ही आराम करा थोडा वेळ झोपा तुम्हाला बरं नाही बरं वाटलं की मग मंदिरात जावा…
आणि सात वाजता वडिलांना अण्णाना परत त्रास झाला अचानक दुखायला लागले आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात त्यांना उदयविकाराचा सौम्य असा झटका आला……
मी कधी पंढरपूरला गेलो नाही मी कधी पांडुरंगाच्या मंदिरात गेलो नाही…
.
मी माझ्या वडिलांना मंदिराची सेवा करताना पाहिले मला असं वाटायचं हे इतकं कष्ट का करतात मंदिरासाठी एवढं का वाहून घेतले घरात का लक्ष देत नाही सर्व काही मी पाहतोय मी करतोय आणि हे फक्त आपलं विठ्ठल विठ्ठल…
.
औंध मध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये वडिलांना घेऊन गेलतो त्या हॉस्पिटल वाल्यांनी आम्हाला आदित्य बिर्ला येथे शिफ्ट करण्यासाठी सल्ला दिला आम्ही सर्व तयारी केली…
.
INFO
Checkpoint & LoRA

Checkpoint
SeaArt Infinity
#Epic Characters
#SeaArt Infinity
0 comment
1
1
0